विकास, विकासाची भाषा आणि राज्यकर्ते, स्वयंसेवी संस्था यांची धूळफेक
विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात- “या जगात कोणीच कोणावर उपकार करत नाही. तुम्ही जर एका गरिबाची सेवा करत आहात, याचा अर्थ तुम्ही उपकार करत नाही. उलट तुम्हाला त्याची सेवा करायची संधी मिळाली, यासाठी तुम्ही त्या गरिबाचे आभार मानायला हवेत.” किती संस्थांची ही वृत्ती आहे? असते? आजकाल ‘आम्ही गरिबी विरुद्ध लढतो’ असा वाक्प्रचार अशा अविर्भावात केला जातो की, जणू काही एका आजाराविरुद्धची लढाई चालू आहे.......